Last Updated:
Property Rules : वृद्धापकाळात अनेक आई-वडील आपल्या आयुष्यभर कमावलेल्या मालमत्तेची योग्य ती व्यवस्था करून ती आपल्या मुलांना देण्याचा विचार करतात. मात्र अनेक वेळा प्रॉपर्टी वाटपाच्या वेळी कुटुंबात वाद निर्माण होतात.
मुंबई : वृद्धापकाळात अनेक आई-वडील आपल्या आयुष्यभर कमावलेल्या मालमत्तेची योग्य ती व्यवस्था करून ती आपल्या मुलांना देण्याचा विचार करतात. मात्र अनेक वेळा प्रॉपर्टी वाटपाच्या वेळी कुटुंबात वाद निर्माण होतात. यामुळे घरगुती तणाव निर्माण होतो, न्यायालयीन संघर्षही उद्भवतो. हे टाळण्यासाठी मालमत्ता ट्रान्सफर करताना कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित आणि स्पष्ट पद्धतींचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या लेखात आपण अशाच काही मूलभूत व सोप्या पद्धती पाहणार आहोत, ज्या वापरून तुम्ही तुमची प्रॉपर्टी वादमुक्तपणे आणि स्पष्टतेने आपल्या मुलांच्या किंवा इच्छित व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करू शकता.
नॉमिनेशन (नामनिर्देशन) पद्धत
नॉमिनेशन ही एक सोपी आणि जलद प्रक्रिया आहे. घर, बँक खाते, शेअर्स, विमा पॉलिसी, फ्लॅट्स अशा मालमत्तांमध्ये तुम्ही नॉमिनी नियुक्त करू शकता. ही व्यक्ती (नॉमिनी) तुमच्या मृत्यूनंतर त्या मालमत्तेची तात्पुरती देखभाल करू शकते. नॉमिनेशनद्वारे तुम्ही प्रॉपर्टीच्या वाटपाबाबत स्पष्टता आणू शकता. कोणत्याही वेळी तुम्ही नॉमिनी बदलूही शकता, यामुळे नियंत्रण तुमच्याजवळ राहतो. ही पद्धत वादांची शक्यता कमी करते, मात्र अंतिम मालकी हक्कासाठी इतर कायदेशीर प्रक्रिया लागते.
मृत्युपत्र (Will) तयार करा
मालमत्तेचे अधिक स्पष्ट आणि अंतिम वाटप करायचे असेल, तर मृत्युपत्र (Will) तयार करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यात तुम्ही तुमच्या संपत्तीचे कोणत्या मुलाला/व्यक्तीला किती आणि काय द्यायचे, हे स्पष्ट लिहू शकता. भारतीय उत्तराधिकार कायदा, 1925 नुसार, मृत्युपत्र कायदेशीर वैध असते. यामुळे मालकाच्या मृत्यूनंतर कोणालाही वाद निर्माण करण्याचा अधिकार राहत नाही, कारण सर्व निर्णय लिहून दिलेले असतात. नोटरी किंवा नोंदणीकृत वकिलाच्या उपस्थितीत मृत्युपत्र तयार करणे अधिक सुरक्षित मानले जाते.
पूर्ण आणि वैध कागदपत्रं असणे आवश्यक
प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना संबंधित मालमत्तेची संपूर्ण आणि वैध कागदपत्रं असणे अत्यावश्यक आहे. मालमत्तेचे खरेदीखत (Sale Deed), सात बारा उतारा, पॅन कार्ड, आधार कार्ड, महसूल अभिलेख, वीजबिल आदी दस्तऐवज तयार ठेवावेत.यामुळे मालमत्तेचा हक्क कोणाकडे आहे, याबाबत शंका राहत नाही. न्यायालयीन प्रकरणांमध्ये ही कागदपत्रं पुरावा म्हणून काम करतात.
Mumbai,Maharashtra
June 24, 2025 1:41 PM IST
आई-वडीलांनी मुलांना प्रॉपर्टी देताना ‘ही’ चूक केली तर कोर्टात जावं लागणार, वाचा सविस्तर