Last Updated:
Agriculuture News : शेती म्हटलं की वाद-विवाद हे ओघानेच येतात. कधी जमीन वाटणीवरून वाद निर्माण होतात, तर कधी शेजाऱ्याने बांध कोरल्यामुळे तंटे होतात. विशेषतः बांध कोरण्याच्या कारणावरून अनेकदा शेतकऱ्यांमध्ये वाद उफाळतात.
मुंबई : शेती म्हटलं की वाद-विवाद हे ओघानेच येतात. कधी जमीन वाटणीवरून वाद निर्माण होतात, तर कधी शेजाऱ्याने बांध कोरल्यामुळे तंटे होतात. विशेषतः बांध कोरण्याच्या कारणावरून अनेकदा शेतकऱ्यांमध्ये वाद उफाळतात. मात्र, अशा अतिक्रमण करणाऱ्यांना आता कायदेशीर मार्गाने चोख प्रत्युत्तर देता येऊ शकते. चला या प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
तुमच्या शेतजमिनीवर कुणी परवानगीशिवाय अतिक्रमण केले असेल, तर ते कायदेशीर मार्गाने हटवता येते. शहरी असो वा ग्रामीण भाग जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते. विशेषतः शेतजमिनीच्या बांधावरील चिन्हे आधीपासून स्पष्ट नसतील, तर शेजारी शेतकरी बांध कोरून हळूहळू अतिक्रमण करत जातात.
जर तुम्हाला शंका असेल की शेतावर अतिक्रमण झाले आहे, तर प्रथम अधिकृत मोजणी करून घेणे आवश्यक आहे. शासकीय पद्धतीने मोजणी केल्यानंतर तुमच्या जमिनीची निश्चित हद्द दर्शवणारा ‘नकाशा क प्रत’ पुरवला जातो. या नकाश्यात तुमच्या जमिनीच्या सर्व सीमारेषा स्पष्टपणे दाखवल्या जातात आणि अतिक्रमणाचा भाग ओळखून सांगितला जातो.
अतिक्रमणाबद्दल कारवाई करण्यासाठी संबंधित शेतकरी तहसील कार्यालयात जाऊन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 138 अंतर्गत अर्ज दाखल करू शकतात. तहसील कार्यालयाकडून अर्जाची तपासणी केली जाते आणि त्यानंतर पुढील कायदेशीर पावले उचलली जातात.
ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण झाले आहे, त्या भागाचा कच्चा नकाशा अर्जासोबत जोडावा. तसेच शासकीय मोजणी झाली असल्यास त्याचा नकाशा जोडणे आवश्यक आहे. त्या जमिनीचा चालू आर्थिक वर्षातील सातबारा उतारा अर्जासोबत जोडावा. जर जमिनीवरून न्यायालयात प्रकरण सुरू असेल, तर त्या प्रकरणातील संबंधित कागदपत्रे जोडावी.
Mumbai,Maharashtra
July 03, 2025 9:31 AM IST
शेजारचा शेतकरी सातत्याने बांध कोरून अतिक्रमण करतोय का? मग हा मार्ग वापराच