Last Updated:
PM Kisan yojana : देशातील लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आजही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदतीची योजना ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची थेट आर्थिक मदत सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.
मुंबई : देशातील लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आजही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदतीची योजना ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची थेट आर्थिक मदत सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांचे तीन हप्ते अशा स्वरूपात वितरित केली जाते.
तुमचा हप्ता मिळणार आहे का?
तुमच्या खात्यात हप्ता जमा होईल की नाही? याची माहिती घेण्यासाठी खालील पद्धत वापरा:
pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या. होमपेजवर “Know Your Status” हा पर्याय निवडा. तुमचा PM-KISAN Registration Number टाका. Captcha कोड भरा आणि “Get Data” वर क्लिक करा. तुमचे स्टेटस स्क्रीनवर दिसेल जिथे तुम्हाला पात्रता, ई-केवायसी, बँक डिटेल्स यांची स्थिती इथे समजेल.
लाभ मिळवण्यासाठी हे काम अनिवार्य
फक्त तेच शेतकरी हप्त्यासाठी पात्र ठरतात, ज्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले, ई-केवायसी अपडेट झालेले आणि भूलेख (land records) सत्यापन झालेले असते. यातील कोणतीही प्रक्रिया अपूर्ण असल्यास तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो.
कोण अपात्र ठरू शकतो?
खासगी नोकरी करणारे, आयकर भरते, शासकीय कर्मचारी किंवा व्यावसायिक व्यक्ती या योजनेतून वगळले गेले आहेत. अशा शेतकऱ्यांनी योजनेच्या अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
20 वा हप्ता कधी मिळणार?
योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी करण्यात आला होता. त्यामुळे 20 वा हप्ता जून 2025 च्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीस जमा होण्याची शक्यता आहे. तथापि, अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर नियमितपणे भेट देऊन अपडेट्स तपासणे गरजेचे आहे.
Mumbai,Maharashtra
June 04, 2025 2:45 PM IST