स्वमालकीची मालमत्ता म्हणजे काय?
वडील किंवा आईने आपल्या नावावर घेतलेली मालमत्ता, जी त्यांनी स्वतःच्या उत्पन्नातून विकत घेतली आहे, किंवा कोणत्याही करार,मृत्यूपत्र किंवा भेटरूपाने (Gift Deed) मिळवलेली आहे, त्याला स्वमालकीची (Self-acquired) मालमत्ता असे म्हणतात. या प्रकारच्या मालमत्तेवर त्यांचा पूर्णस्वतःचा हक्क असतो. त्या व्यक्तीला ती मालमत्ता हवे तसे वापरण्याचा, विकण्याचा, दान करण्याचा किंवा वसीयत करण्याचा संपूर्ण अधिकार असतो.
स्वमालकीच्या मालमत्तेवर मुलांचा कोणताही हक्क नाही
जर वडिलांनी मालमत्ता स्वतःच्या नावावर मिळवलेली आहे आणि तिच्यावर वसीयत (Will) केली आहे, तर त्यानुसार ही मालमत्ता कोणालाही दिली जाऊ शकते. अगदी मुलगा, मुलगी किंवा कोणताही वारसदार नसलेला व्यक्तीही असू शकतो.
वडिलोपार्जित मालमत्ता वेगळी असते
वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी वडिलांना त्यांच्या वडिलांकडून, आणि त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून उत्तराधिकाराने मिळालेली असते. अशा संपत्तीत मुलांचा काही प्रमाणात हक्क असतो.
परंतु जर वडिलांनी ही वडिलोपार्जित मालमत्ता स्वतःच्या नावे करून ती पुन्हा विकत घेतली, पुनर्निर्माण केली किंवा तिचा प्रकार बदलला असेल, तर ती पुन्हा स्वमालकीची ठरू शकते, आणि त्यावर पूर्वीचा वारसा हक्क लागू होत नाही.
महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे
हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 नुसार स्वमालकीच्या मालमत्तेवर वडिलांचा हक्क सर्वोच्च मानला जातो. वडील जिवंत असताना त्यांच्या मालमत्तेत मुलांना कोणताही हक्क नाही, फक्त अपेक्षा असू शकते. वडिलांनी वसीयत केली असेल, तर तिचे पालन अनिवार्य असते. वडील जिवंत असताना मुलांनी जबरदस्तीने मालमत्तेवर दावा केल्यास तो गैरकायदेशीर ठरतो.
Mumbai,Maharashtra
June 26, 2025 1:37 PM IST
वडिलांच्या मालमत्तेवर मुलांचा कोणता अधिकार लागू होत नाही? कायदा काय सांगतो