Last Updated:
Women Success Story: महिला शेतकरी ज्योती चव्हाण यांनी सेंद्रिय खताचा वापर करत कांदा शेती करत आपल्या 2 एकर शेतात कांद्याचे उत्पादन घेतले आहे. कांदा शेतीतून त्यांनी 180 किंवा 200 क्विंटल कांदा काढला आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हिवरा येथील महिला शेतकरी ज्योती चव्हाण यांनी सेंद्रिय खताचा वापर करत कांदा शेती करत आपल्या 2 एकर शेतात कांद्याचे उत्पादन घेतले आहे. कांदा शेतीतून त्यांनी 180 किंवा 200 क्विंटल कांदा काढला आहे. या कांदा शेतीच्या माध्यमातून त्यांना 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते, सेंद्रिय शेतीमुळे जमीन सुपीक राहते, उत्पादन टिकाऊ होते आणि उत्पन्नातही वाढ होते, असे चव्हाण यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे.
डिसेंबर महिन्यात कांद्याचे रोप टाकण्यात येते, जानेवारीत त्याची लागवड करण्यात येते, या लागवडीसाठी 10 मजुरांची गरज भासते. फेब्रुवारी–मार्च दरम्यान कांदा काढणीला येतो. हवामान स्थिर राहिल्यास अधिक उत्पन्न मिळते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे काही वेळा नुकसानही होते. जास्त काळ कांदा सावधगिरीने साठवून ठेवला तर त्याचे भाव काही दिवसांनी वाढतात त्यामुळे चांगली कमाई होते, असे देखील चव्हाण यांनी सांगितले आहे.
कांदा शेती महिला आणि पुरुषांनी करायला हवी, यामध्ये मेहनत आणि कष्ट घेतले तर चांगली कमाई आहे. नवीन शेतकरी कांद्याच्या शेतीचा प्रयोग सुरू करणार असतील तर त्यांच्यासाठी पुढील माहिती महत्त्वाची असणार आहे. कांद्याची लागवड केल्यानंतर दोन वेळा त्याची खुरपणी करावी लागते, कांदा काढणीला आल्यावर साठवून ठेवायचा आणि 1 महिन्यानंतर त्याला पलटी द्यावी लागते. पलटी दिल्यानंतर कांदा विक्रीसाठी तयार होतो, कांद्याची विक्री बाजारात किंवा व्यापाऱ्यांकडे करू शकतो. त्यांच्या अनुभवातून नवीन शेतकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळत आहे.
Aurangabad,Maharashtra
July 03, 2025 7:47 PM IST
Women Success Story: सेंद्रिय खताचा वापर, महिला शेतकऱ्याने कांदा शेती केली यशस्वी, वर्षाला 3 लाख उत्पन्न!