महत्त्वाचे बदल काय?
जिओ टॅगिंग सक्तीचे
यापूर्वी जिओ टॅगिंगची अट असली तरी तिच्या अंमलबजावणीत शिथीलता होती. परंतु यंदा जिओ टॅगिंगसह फळबागेचे छायाचित्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की यंदा कोणतीही शिथीलता न ठेवता सर्व अर्जांची जिओ टॅगिंगद्वारे पडताळणी केली जाणार आहे.
ई-पीक पाहणीशी जुळवणी अनिवार्य
फळबागांचे क्षेत्र आणि मूळ आकृतिबंध ई-पीक पाहणी प्रणालीमध्ये योग्य प्रकारे नोंदले गेले नसल्यास, विमा अर्ज सरसकट रद्द केले जातील. ही शर्त जरी अर्ज भरण्याच्या वेळेस बंधनकारक नसली, तरी नंतर याची पूर्तता आवश्यक असेल.
फार्मर आयडी सक्तीचा
अर्ज करताना शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक नोंदणी (Farmer ID), आधार कार्ड, बँक पासबुक व जमीन उताऱ्यासह सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील.
अर्ज भरण्याची अंतिम मुदतीत बदल
फळपिकांवरील विमा अर्जासाठी पूर्वनिर्धारित अंतिम मुदती पुढीलप्रमाणे होत्या:
मोसंबी व चिकू – 30 जून
डाळिंब -14 जुलै
सीताफळ -31 जुलै
या व्यतिरिक्त लिंबू, द्राक्ष, पेरू व संत्रा यांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 14 जून रोजी पूर्ण झाली.परंतु शेतकऱ्यांना यंदा पुरेसा वेळ न मिळाल्याचे कृषी विभागाने मान्य केले आहे.
केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि विमा कंपन्यांच्या सहमतीनुसार, अर्जासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. चारपैकी तीन विमा कंपन्यांनी होकार दिला असून, चौथी कंपनीदेखील तयार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. प्रस्ताव मंजूर झाल्यास किमान आठ दिवसांची अतिरिक्त मुदत मिळण्याची शक्यता आहे.
फळपीक विमा कशासाठी महत्त्वाचा?
अतिवृष्टी, अल्पवृष्टी, पावसातील खंड आणि जास्त आर्द्रतेमुळे फळबागांवर मोठा परिणाम होतो. अशा वेळेस विमा योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. त्यामुळे योग्य कागदपत्रांसह वेळेत अर्ज भरणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा?
अर्ज www.ncip.gov.in या राष्ट्रीय कृषी विमा पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरता येतो.
सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तयार ठेवा. अर्ज भरताना मोबाईल नंबर, आधार व बँक खात्याची माहिती अचूक भरणे गरजेचे आहे.
Mumbai,Maharashtra
June 15, 2025 8:49 AM IST
कृषी विभागाचा नवा निर्णय! पीक विम्यासाठी ही अट अनिवार्य, अन्यथा अर्ज रद्द होणार