दरम्यान, बंगालच्या उपसागरात 23 मे ते 28 मे दरम्यान एक प्रचंड वेगाने चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संभाव्य चक्रीवादळाचे नाव ‘शक्ती’ असे असेल. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, 16 ते 18 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे विकसित होऊन चक्रीवादळाचे रूप घेऊ शकते.
पावसाचा अंदाज आणि यलो अलर्ट
हवामान विभागाने 16 मेपर्यंत कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. राज्यात अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता असून, काही भागांमध्ये गडगडाटासह पाऊस पडू शकतो. कोलकात्यामध्ये देखील पुढील 24 तासांत, संध्याकाळी गडगडाटासह हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशभरातील इतर भागांतील हवामान स्थिती
13 व 14 मे दरम्यान पुढील भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे:
गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अंतर्गत कर्नाटक
तामिळनाडू, झारखंड, केरळ, पुद्दुचेरी, कराईकल, रायलसीमा
या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा
मान्सूनपूर्व पाऊस व संभाव्य चक्रीवादळामुळे शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. उभ्या पिकांचे संरक्षण, साठवलेले बियाणे व खते सुरक्षित ठेवणे आणि पाण्याचा निचरा सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे.
Mumbai,Maharashtra
शेतकऱ्यांनो सावधान! ‘शक्ती’ चक्रीवादळाचं संकट, या भागात पडणार मुसळधार पाऊस