Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्रातील पारंपरिक शेतीला पर्याय शोधत अनेक शेतकरी आता नाविन्यपूर्ण आणि फायदेशीर पिकांकडे वळत आहेत. अशाच एका नव्या शेती पद्धतीने म्हणजे सिंदूर शेतीने ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी नवी दिशा दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील पारंपरिक शेतीला पर्याय शोधत अनेक शेतकरी आता नाविन्यपूर्ण आणि फायदेशीर पिकांकडे वळत आहेत. अशाच एका नव्या शेती पद्धतीने म्हणजे सिंदूर शेतीने ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी नवी दिशा दिली आहे. मर्यादित पाणी, कमी मेहनत आणि तुलनात्मकतः कमी खर्चात अधिक नफा मिळवून देणारे हे पीक आता हाय व्हॅल्यू क्रॉप म्हणून ओळखले जात आहे.
सिंदूर म्हणजे नेमकं काय?
सिंदूर हे बिक्सा ओरेल्याना नावाच्या वनस्पतीपासून तयार होते. याचे फळ गडद केशरी-तांबड्या रंगाचे असते आणि त्यामधून मिळणाऱ्या बियांपासून ‘अॅनॅटो (Annatto)’ नावाचा नैसर्गिक रंग तयार होतो. हा रंग प्रामुख्याने अन्नप्रक्रिया उद्योगात वापरला जातो, शिवाय सौंदर्यप्रसाधने, औषधे आणि धार्मिक उपयोगासाठीही याला मोठी मागणी आहे. त्यामुळे याच्या किमती सतत चांगल्या पातळीवर राहतात.
लागवड प्रक्रिया नियोजन
लागवडीचा कालावधी जून ते ऑगस्ट असतो. एक एकरात सुमारे 300–450 रोपे लावली जातात.
प्रत्येकी 4 ते 5 रुपये दराने रोपे उपलब्ध असतात. लागवडीनंतर 2 वर्षांत सुरू होते आणि 7 ते 8 वर्षे सतत उत्पादन मिळते. एका झाडापासून वर्षाला सरासरी 1.5 ते 2 किलो बिया मिळतात.
400 ते 600 रुपये प्रति किलो या हिशोबानुसार, एका एकरातून दरवर्षी 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न सहज मिळवता येते. हवामान आणि जमिनीच्या अनुकूलतेमुळे विस्तार शक्य सिंदूर पीक उष्ण व दमट हवामानात चांगले फुलते.मध्यम कसदार किंवा हलकी जमीन यासाठी उत्तम ठरते. पाण्याची आवश्यकता तुलनेत कमी, त्यामुळे कोरडवाहू भागातही सहज उत्पादन कमी होते. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव नगण्य, त्यामुळे रासायनिक औषधांवरील खर्चही कमी लागतो
आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी
सिंदूर उत्पादनाला केवळ देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी आहे. नैसर्गिक रंगद्रव्यांना अन्न उद्योगात प्राधान्य मिळू लागल्याने या पिकाचे महत्त्व अधिकच वाढत आहे. यामुळे, योग्य मार्गदर्शन, प्रक्रिया सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास, सिंदूर शेतीमुळे ग्रामीण शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळू शकते.
Mumbai,Maharashtra
June 14, 2025 10:52 AM IST