यामध्ये महसूल विभागाच्या अभिलेखातून शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतांची माहिती घेऊन, त्या माहितीशी शेतकऱ्याचा आधार क्रमांक जोडण्यात येतो. त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एक अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) दिला जात आहे.
कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी मिळवणे आता अनिवार्य असून, 15 एप्रिल 2025 पासून याशिवाय कोणतीही योजना उपलब्ध होणार नाही.
फार्मर आयडी मोबाईलवर कसा तयार कराल?
फार्मर आयडी काढण्यासाठी कुठेही कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून सहज नोंदणी करू शकता. त्यासाठी पुढील प्रक्रिया वापरा:
1. https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या लिंकवर क्लिक करा.
2. पेज उघडल्यानंतर “Farmer” या पर्यायावर क्लिक करा.
3. “Create New User Account” वर क्लिक करा.
4. तुमची “Aadhar E-KYC” प्रक्रिया पूर्ण करा.
5. आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका.
6. “Verify” वर क्लिक करा.
7. त्यानंतर शेतकऱ्याची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. येथे तुम्ही Agristack Portal साठी मोबाईल क्रमांक लिंक करावा.
8. मोबाईल क्रमांक लिंक करताना पुन्हा OTP येईल, तो टाकून मोबाईल नंबरची पुष्टी करा.
9. नंतर Agristack Profile Password सेट करा (Password आणि Confirm Password भरा).
10. “Create My Account” वर क्लिक करा.
11. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर Profile तयार होईल.
12. नंतर “Ok” क्लिक करा.
13. तुम्ही परत Login Page वर येईल. येथे Username म्हणून तुमचा मोबाईल क्रमांक टाका व लॉगिन करा.
14. “Register as Farmer” या पर्यायावर क्लिक करा.
15. मोबाईल नंबर तपासण्यासाठी “Mobile Confirmation” पेज उघडेल. जर मोबाईल नंबर बदलायचा नसेल तर “No” क्लिक करा.
16. यानंतर Farmer ID Form उघडेल.
17. येथे Farmer Details मध्ये तुमचं पूर्ण नाव व उर्वरित माहिती भरून सबमिट करा.
Mumbai,Maharashtra
April 29, 2025 8:14 AM IST
शेतकऱ्यांची चिंता मिटली! मोबाईलवरून मिळवता येणार फार्मर आयडी,प्रक्रिया जाणून घ्या