Last Updated:
Sindoor Plant : भारतीय संस्कृतीमध्ये सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. विवाहित महिलांच्या साजशृंगारात याला विशेष महत्त्व आहे. परंतु, हे सिंदूर तयार कसे केले जाते, याची माहिती फार कमी लोकांना असते.
मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. विवाहित महिलांच्या साजशृंगारात याला विशेष महत्त्व आहे. परंतु, हे सिंदूर तयार कसे केले जाते, याची माहिती फार कमी लोकांना असते. सिंदूराची निर्मिती एका खास वनस्पतीपासून केली जाते कुमकुम ट्री किंवा कॅमल ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधी झाडापासून.
बियांपासून मिळतो लाल रंगाचा नैसर्गिक अर्क
कुमकुम झाडाच्या फळांमधून साधारणतः दीड किलोपर्यंत बिया मिळतात. या बियांमध्ये नैसर्गिक लाल रंग भरपूर प्रमाणात असतो. या बियांपासून मिळणाऱ्या रंगद्रव्याचा वापर सिंदूरासह अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. यात लिपस्टिक, केसांचा रंग, नेलपॉलिश आणि अगदी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठीही याचा वापर केला जातो. सिंदूराचे सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व दोन्ही ठिकाणी उपयोग होतो.
वैज्ञानिक संशोधनही सुरू
सिंदूर हे पारंपरिक आहे, पण आजच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणावर रासायनिक (सिंथेटिक) सिंदूर उपलब्ध आहेत. हे सिंथेटिक रंग आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असे शास्त्रज्ञ सांगतात. याच पार्श्वभूमीवर बिहार कृषी विद्यापीठात (BAU) सिंदूरावर विशेष संशोधन सुरू आहे.
या संशोधनात अशा सिंदूराचा विकास करण्यात येत आहे जो नैसर्गिक, विषारी नसलेला आणि पर्यावरणपूरक असेल. यासाठी विशेष निष्कर्षण (extraction), स्थिरीकरण (stabilization) आणि फॉर्म्युलेशन (formulation) तंत्रांचा वापर केला जात आहे. यामुळे सिंदूराचा रंग अधिक काळ टिकेल, त्याची शेल्फ-लाइफ वाढेल आणि उत्पादनाची गुणवत्ताही सुधारेल.
कुमकुम ट्रीची लागवड कशी करायची?
कुमकुम किंवा कॅमल ट्रीची लागवड उष्ण आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळणाऱ्या भागात केली जाते. याची लागवड बियाण्यांपासून किंवा कलमांपासून करता येते. याची खासियत म्हणजे ही झाडे घरच्या कुंड्यांमध्येही सहज वाढवता येतात. त्यामुळे नैसर्गिक सिंदूर तयार करण्यासाठी ही वनस्पती छोट्या प्रमाणातही लागवड करता येते.
Mumbai,Maharashtra
पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर! ते कोणत्या झाडापासून तयार होतं? जाणून घ्या सविस्तर