Last Updated:
Agriculture News : सध्या देशभरातील अनेक राज्यांतील शेतकरी रब्बी हंगामातील शेवटच्या टप्प्यातील पीक काढणीच्या कामात व्यस्त आहेत. यानंतर आता खरीप हंगामाच्या तयारीला वेग येतो आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतांमध्ये हंगामातील पीक घेतले आहे, मात्र खरीप पेरणीसाठी ते जून- जुलैदरम्यान सज्ज होतील.
मुंबई : सध्या देशभरातील अनेक राज्यांतील शेतकरी रब्बी हंगामातील शेवटच्या टप्प्यातील पीक काढणीच्या कामात व्यस्त आहेत. यानंतर आता खरीप हंगामाच्या तयारीला वेग येतो आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतांमध्ये हंगामातील पीक घेतले आहे, मात्र खरीप पेरणीसाठी ते जून- जुलैदरम्यान सज्ज होतील. अशा वेळी खरीप मधील एक प्रमुख तेलबिया पीक म्हणजे सोयाबीन हे आहे. त्याच्या काही भरघोस उत्पादन देणाऱ्या जातींबाबत माहिती घेऊया.ज्या तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात.
1) BS 6124 – जात
उत्पादन : प्रतिहेक्टर 20 ते 25 क्विंटल
बियाण्यांची गरज : प्रति एकर 35–40 किलो
पिकाचा कालावधी : 90–95 दिवस (सुमारे 3 महिने)
वैशिष्ट्ये : या जातीला जांभळ्या रंगाची फुले आणि लांबट पाने असतात.
ही जात जलद परिपक्व होते आणि अल्प कालावधीत चांगले उत्पादन देते.
2) JS 2034 – जात
उत्पादन : प्रतिहेक्टर 24–25 क्विंटल
बियाण्यांची गरज : प्रति एकर 30–35 किलो
पेरणीचा योग्य कालावधी : 15 जून ते 30 जून
पिकाचा कालावधी : 80–85 दिवस
3) JS 2069 – जात
उत्पादन : प्रतिहेक्टर 22–26 क्विंटल
बियाण्यांची गरज : प्रति एकर 40 किलो
पिकाचा कालावधी : 85–94 दिवस
फुले व दाणे : पांढरी फुले, चमकदार दाणे
यंदा पुन्हा चांगल्या उत्पादनाची शक्यता
केंद्र सरकारने स्वदेशी खाद्यतेल उत्पादन वाढवण्यासाठी आणि स्वयंपूर्णता साधण्यासाठी सोयाबीन लागवड वाढवण्यावर भर दिला आहे. मागील वर्षी समाधानकारक पावसामुळे सोयाबीनचा मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले होते. त्यात मध्य प्रदेशने आघाडी घेतली होती, तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर होता.
यंदाही मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे सोयाबीन उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीन पेरणीसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जुलैच्या मध्यापर्यंतचा कालावधी सर्वोत्तम मानला जातो.
Mumbai,Maharashtra
यंदाच्या खरिप हंगामात सोयाबीन जोमात येणार! लागवडीसाठी या 3 वाणांची करा निवड