By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : खरीप हंगाम उंबरठ्यावर! बियाणे, खते खरेदी करताना घ्या ही काळजी, वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : खरीप हंगाम उंबरठ्यावर! बियाणे, खते खरेदी करताना घ्या ही काळजी, वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : खरीप हंगाम उंबरठ्यावर! बियाणे, खते खरेदी करताना घ्या ही काळजी, वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/12 at 8:08 AM
News Desk
Share
2 Min Read

बोगस बियाण्यांचा फटका टाळण्यासाठी काळजी घ्या

पेरणीच्या ऐन वेळेस बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून बियाणे आणि खते महाग दराने विकले जातात. तसेच, अनधिकृत विक्रेत्यांकडून दिले जाणारे बोगस किंवा कालबाह्य बियाणे उत्पादनावर परिणाम करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पासूनच खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रांमधूनच खरेदी करा

अधिकृत परवाना व विक्री नोंद असलेल्या केंद्रांमधूनच खरेदी करण्यास प्राधान्य द्या. महाबीज, नाफेड, सिडको, कृषी विद्यापीठांची बियाणी ही विश्वासार्ह आणि दर्जेदार मानली जातात.

बियाण्याच्या पिशवीवरील माहिती तपासा

बियाण्याचा प्रकार, अंकुरणशक्ती, उत्पादन वर्ष, कालबाह्यता दिनांक, लॉट क्रमांक यांची तपासणी करावी.

खरेदीचं बिल व पावती अवश्य घ्या, यामुळे बियाणे बोगस निघाल्यास नुकसानभरपाईसाठी दावा करता येतो.

स्वस्त दराचे आमिष टाळा

स्थानिक बाजारात अनेकदा स्वस्त दरात बियाणे विकले जाते, पण ती बियाणे बिनपरवानी व बोगस असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनोळखी, अनधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करण्याऐवजी सरकारी संस्था किंवा सहकारी संस्थांच्या केंद्रांवरून खरेदी करणे योग्य.

खतांची खरेदी करताना लक्षात ठेवा

FCO नोंदणीकृत दुकानातूनच खरेदी करा

खत नियंत्रण आदेश (FCO) अंतर्गत नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करणे सुरक्षित. उत्पादन दिनांक, वजन, प्रमाणपत्र क्रमांक, उत्पादकाचे नाव यासारखी माहिती खतांच्या पिशवीवर तपासा.

बंद बॅगमध्येच खते घ्या

उघड्या स्वरूपात विकली जाणारी खते टाळा. खते खरेदी करताना पावती घेणे अनिवार्य, जेणेकरून भविष्यात काही त्रास झाल्यास कायदेशीर मदत मिळू शकते.

दरम्यान, बोगस बियाण्यांमुळे एकदा तरी नुकसान सहन करावे लागलेले अनेक शेतकरी दरवर्षीच अडचणीत सापडतात. म्हणून यंदा मान्सून वेळेआधी येणार असल्याने, वेळेत तयारी करून आणि योग्य ती खबरदारी घेऊनच खरेदी करावी. शेतकरी सजग राहिल्यासच दर्जेदार उत्पादन आणि आर्थिक फायदे मिळवता येतील.

Location :

Mumbai,Maharashtra

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article वडिलोपार्जित जमीन, मालमत्तेवर दावा करायचा आहे का? मग तुम्हाला हे हक्क माहीत असायलाच हवे
Next Article ऊस शेतीला दिला फाटा, केली शेवग्याची लागवड, सोलापूरचा शेतकरी करतोय लाखात कमाई!
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

ताबडतोब तयार केलेल्या डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपये स्विगी देतील – त्वरित डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपयांना स्विगी देतील
Business July 1, 2025
‘सामग्री असंवैधानिक सामग्री काढून टाकण्याचा आदेश’, एक्सने कोर्टात सरकारला आव्हान दिले, असे कलम A A ए चा गैरवापर होत आहे – एक्सला आव्हान दिले आहे की भारत सरकारची सामग्री काढून टाकण्याचे आदेश कलम ara ए सेन्सॉरशिप एमएचए पोर्टल असंवैधानिक
Business July 1, 2025
केस्टोन मुंबईच्या क्षेत्राचा पुनर्विकास करेल – केस्टोन मुंबई क्षेत्रासह पुनर्निर्मिती करेल
Business July 1, 2025
पुणे रिअल इस्टेट: पुण्यातील गोदाम आणि औद्योगिक रिअल इस्टेटची भरभराट, मुंबई-दिल्ली मागे डावीकडे; परदेशी गुंतवणूकदार देखील व्याज दर्शवित आहेत – पुणे औद्योगिक रिअल इस्टेट ग्रोथ 2030 डिमांड जेएलएल रिपोर्ट ग्रेड ए वेअरहाउसिंग
Business July 1, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?