जमिनींचे तीन मुख्य प्रकार
1) जुनी शर्तीची जमीन ( वर्ग 1)
खाजगी मालकीची जमीन.
व्यवहारासाठी शासनाची परवानगी लागत नाही.
सातबाऱ्यावर “खा” किंवा तत्सम नोंद असते.
व्यवहार सुलभ, कायदेशीर धोके कमी होतात.
2) नवीन शर्तीची जमीन (वर्ग 2)
वतन, इनाम, पुनर्वसन वा भूसंपादनातून दिलेली जमीन.
विक्रीसाठी शासनाची पूर्वमंजुरी आवश्यक.
सातबाऱ्यावर “शासकीय अट” किंवा “शर्त लागू” असा उल्लेख.
परवानगीशिवाय व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर.
3)शासकीय पट्टेदार जमीन
फक्त वापरासाठी दिलेली जमीन, मालकी हक्क नाही.
विक्री/हस्तांतरणासाठी शासनाची संमती बंधनकारक.
अटी मोडल्यास शासन जमीन परत घेऊ शकते.
‘धारणप्रकार’ ही नोंद काय सांगते?
धारणप्रकार म्हणजे जमीन कोणत्या अधिकारानुसार वापरली जाते हे स्पष्ट करणारा प्रकार आहे. उदाहरणार्थ, जमीन शाश्वत मालकीत आहे की केवळ उपयोगासाठी दिली आहे, यावरच व्यवहाराची कायदेशीरता ठरते.
दुर्लक्षाचे परिणाम काय काय होऊ शकतात?
परवानगीशिवाय खरेदी केल्यास ती जमीन सरकार ताब्यात घेऊ शकते.
जमीन व्यवहार रद्द होऊ शकतो.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊ शकते.
फसवणुकीचा धोका वाढतो.
गुंतवलेले पैसे अडकू शकतात.
व्यवहारापूर्वी काय करावे?
सातबारा उताऱ्यावर ‘शर्ती’ व ‘धारणप्रकार’ नीट तपासावा.
तलाठी, तहसीलदार किंवा कृषी विभागाकडून कागदपत्रे पडताळून घ्यावीत.
कायदेशीर सल्ला घेऊन व्यवहार करावा.
शासनाची परवानगी आवश्यक असेल तर ती आधी घ्यावी.
Mumbai,Maharashtra
May 27, 2025 12:35 PM IST