उन्हाळी काकडी शेती का फायदेशीर ठरते?
काकडीचे पीक अवघ्या 50 ते 60 दिवसांत तयार होते.एप्रिल ते जून या काळात बाजारात काकडीला 15 ते 30 प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो.उन्हाळ्यात थंडावा देणारी भाजी म्हणून काकडीला हॉटेल, हॉस्पिटल, रस्त्यावरील विक्रेते आणि ग्राहकांकडून सतत मागणी असते.झाडाला प्रत्येक 2 ते 3 दिवसांनी काकड्या येतात.त्यामुळे सातत्याने उत्पन्न मिळते. इतर पिकांपेक्षा उत्पादन खर्च कमी आणि नफा अधिक मिळतो.
काकडी शेतीसाठी पद्धतशीर मार्गदर्शन
योग्य हवामान आणि जमिन निवड –
काकडीसाठी हलकी ते मध्यम काळी जमीन सर्वोत्तम असते.तापमान 25°C ते 35°C दरम्यान असावे.उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते.
बियाण्यांची निवड –
‘हायब्रिड’ जाती अधिक उत्पादनक्षम.उदाहरणार्थ: ‘Pahuja 555’, ‘Hirkani’, ‘Kavita’, ‘VNR Cucumber’, ‘Muskan’ इत्यादी.
लागवड आणि सिंचन –
झाडामधील अंतर 1.5 फूट ठेवावे. ओळीतील अंतर 4-5 फूट ठेवावी. ठिबक सिंचन वापरल्यास पाण्याची बचत होते आणि दर्जाही सुधारतो.
खत व्यवस्थापन –
शेणखत + नीट नियोजन केलेले रासायनिक खते.सुचवलेली मात्रा: नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K) योग्य प्रमाणात प्रमाणात वापर करा.
कीड व रोग नियंत्रण –
लाल कोळी, सफेद माशी, खोडकिडा यावर वेळच्या वेळी फवारणी आवश्यक.सेंद्रिय फवारणीस प्राधान्य दिल्यास उत्पन्नाचा दर्जा टिकतो.
काढणी आणि विक्री –
50–60 दिवसांनी काढणी सुरू होते. प्रत्येक 2-3 दिवसांनी काढणी केली जाते. विक्रीसाठी थेट बाजारपेठा, हॉटेल, थाळी सेंटर किंवा रिटेल विक्रेत्यांशी टाय-अप करावा. जेणेकरून चांगला बाजारभाव मिळेल.
Mumbai,Maharashtra